* नवी मुंबई महानगरपालिका मार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २८/०२/२०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे . तरी कृपया सर्व वापरकर्त्यानी याची नोंद घ्यावी .
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागा मार्फत जारी केलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना खाली प्रदर्शित केल्या आहेत. कृपया योजनेकरिता अर्ज करण्यासाठी. पुढे जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची यादी तपासा व आपण ज्या घटकामध्ये मोडत आहात त्याची योग्य निवड करा.
विधवा /घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण
इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाईकामगार व कंत्राटीपध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
नवी मुंबईक्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाकाकामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
बँक खाते विद्यार्थ्यांचे असणे आवश्यक आहे.
सदर बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.
बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे.
सदर बँक खाते नवी मुंबईतील असावे.
सोबत जोडणारे कागदपत्र मूळ प्रतीचे असणे आवश्यक आहे.
कागदपत्र पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज करा